महत्वाच्या बातम्या

 कोटगल टी-पॉइंट ते कोर्ट टी-पॉइंट मार्ग ५ जुलैला रहदारीसाठी बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, ०५ जुलै २०२३ वार बुधवार रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे. तरी ०५ जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉइंट ते कोर्ट टी-पॉइंट दरम्यानचा मार्ग ०५ जुलै वेळ सकाळी ०५.०० वा. ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणा­ऱ्या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय टी-पॉइंट येथील खुल्या मैदानात केली असून, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हि.व्हि.आय.पी.) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय, या ठिकाणी केलेली आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos