महत्वाच्या बातम्या

 नागपूर ते पुणे प्रवास आता होणार आठ तासात : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


विदर्भ न्युज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन मार्ग जोडणार असल्याची गडकरी यांनी ट्वीट करून सांगितले. पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला आठ तासांत पोहोचने शक्य होईल, असे नितीन गडकरींनी म्हटले आहेत.
सध्या मुंबई नागपूर ला जोडणारा आणि महाराष्ट्रातील या दोन्ही महत्त्वाच्या शहराला जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आहे. यातच आता पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. नागपूर ते पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाईल.
या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवासासाठी हा मार्ग झाल्यानंतर आठ तासांचाच कालावधी लागेल, असे गडकरींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या ट्वीट नंतर चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी या घोषणेचे स्वागत केले तर काहींनी समृद्धी महामार्गद्वारे नागपूर मुंबई प्रवास सुरु होणार होता त्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थिती केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos