होळीच्या पार्श्वभूमीवर संशयीत आरोपींची धरपकड, ४३ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार परीविक्षाधिन पोलिस अधिकारी नवनित काॅवल, पोलिस निरीक्षक दीपक गोतमारे यांनी पाच पथके तयार करून होळीच्या पाश्र्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयीतांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत ४३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ३ महिलांना दारूसहीत पकडले आहे. दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेत १५ संशयीत आरोपींच्या घरांची शस्त्रसाठा असल्याच्या कारणावरून तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान ६० ते ७० हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत परीविक्षाधिन पोलिस अधिकारी नवनित काॅवल हे स्वतः दुचाकीवर बसून लक्ष ठेवून होते. यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. काही संशयीतांनी शहर सोडून पळ काढला आहे. ही कारवाई लोकसभा निवडणूक आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार परीविक्षाधिन अधिकारी नवनित काॅवल, पोलिस निरीक्षक दीपक गोतमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धोबे, पोलिस उपनिरीक्षक टेंभुर्णे, पोलिस उपनिरीक्षक परताडे, पोलिस उपनिरीक्षक दरांडे, गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी आदींनी केली आहे. या कारवाईत ४० ते ५०  कर्मचारी सहभागी झाले होते. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-18


Related Photos