महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार प्रभु सादमवार आचार्य पदवीने सन्मानित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे कार्यरत असलेले सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे मिळालेल्या आचार्य पदवीने ५ जुलै रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक व्यवस्थापनाचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या अध्ययन अभिरुचीवर होणारा परिणाम एक चिकित्सक अभ्यास हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.

दुर्गम, अतिदुर्गम भागात जंगलात राहणारा आदिवासी विद्यार्थी जेव्हा पहिल्या दिवशी आश्रमशाळेत जातो तेव्हा तो घाबरलेला असतो. शैक्षणिक वातावरणापासून कोसो दूर असलेल्या अशा बाल्यावस्थेत आश्रमशाळेत पहिल्या वर्गात प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या व्यवस्थापनाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांची बोलीभाषा, संस्कृती, छंद, आवड याला जुळवून घेऊन बालकांच्या शैक्षणिक विकासाला आकार द्यावे. त्यासाठी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण त्यांच्या जीवनशैली अनुरूप केल्यास अपेक्षित बदल होईल का? यासाठी संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विषय निवडला.

मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाठ, सह मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. गणेश पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.

संशोधना करिता त्यांना प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. संजय बरडे, डॉ. राजेश पत्तीवार, डॉ. शिवराम सातपुते, डॉ. देवेंद्र भगत, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त दशरथ कुळमेथे, सह आयुक्त महेश जोशी, प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष, सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर, निलय राठोड, आई राजेश्वरी सादमवार, सुमन गोविंदवार, सविता सादमवार, आकाश सादमवार, मनोज गोविंदवार हरिष गोविंदवार, देवयानी गोविंदवार, अजित येरोजवार, स्वाती गोविंदवार, मंगेश स्वामी, विनेश रामानुजमवार आदींचे सहकार्य लाभले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos