आमगाव, आरमोरी, अहेरी, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ पर्यंत मतदान


- जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येत्या ११ एप्रिल रोजी होत असलेल्य लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६  वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील आमगाव, आरमोरी, अहेरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
ब्रम्हपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान करता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागात मतदान केंद्रे आहेत. यामुळे मतदानाची वेळ दुपारी ३ वाजतापर्यंत ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी निर्भिडपणे मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos