आपल्या वेगळेपणाने सुपरिचित झाली छतीसगड राज्याच्या सीमेवरील हटझर जि.प.शाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा :
तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील भागातील छतीसगड राज्याच्या  सीमेवरील जि.प.शाळा हटझर ही आपल्या वेगळेपणाने सध्या जिल्हात सुपरिचित ठरत आहे. दुर्गम,संवेदनशील भागात शिक्षण विभागातील  कोणतेही वरिष्ठ अधिकारी फार कमी प्रमाणात शाळा भेटी करतात. क्वचितच ते अशा शाळांना भेटी देतात.
डीआयईसीपीडी संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी विषय सहाय्यक डाॅ. विजय रामटेके यांच्यासोबत  धानोरा तालुक्यातील काही दुर्गम भागातील शाळांना भेटी दिल्याने दुर्गम भागात शिक्षणासाठी शिक्षक करीत असलेल्या कामाची माहिती समोर आली. त्यानी तालुक्यातील जि.प.शाळा  हटझर या शाळेला भेट दिली असता. त्यांना शाळेतील अनेक नाविन्यपूर्ण व चांगले कृती कार्यक्रम अनुभवायला मिळालेत. या शाळेतील उपक्रमशिल शिक्षका मंगला सुरकर व नीलीमा आखाडे यांनी अनेक समस्यांवर मात करत या शाळेला नावारुपाला आणले आहे. शंभर टक्के छतीसगडी  भाषा बोलनारे विद्यार्थी आज अस्सल व शुद्ध मराठी भाषा निर्भीडपणे बोलतात. लोक सहभागातून शिक्षकांनी शाळेत नयनरम्य बाग तयार केली. तसेच लोकसहभागातून शाळा डीजीटल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना  गटातून वाचन करता यावे यासाठी वाचन कुटी तयार करण्यात आली आहे. अध्ययन अध्यापनात नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. भाषा व गणित पेटी व्दारे विद्यार्थी स्वता:हून शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्याना दृक श्राव साधनाव्दारे रंजक व गमतीशीर व सहअभिनयातून गाणी , गोष्टी शिकविले जाते. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. विशेष म्हणजे पुढील वर्षी शाळेत दाखल पात्र विद्यार्थी आताच शाळेत येऊन बसतांना दिसतात.
तरंग चित्र हे या शाळेतील आकर्षणाचे केंद्र आहे.विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर अनेक प्रकारचे चित्र व अंक व शब्द दिसत असल्याने विद्यार्थी ते आवडीने शिकताना दिसतात. बोली भाषेची अडचण असताना सुध्दा शिक्षकांनी बोली भाषेतील पुस्ताकाचे आधारे विद्यार्थीना प्रमाण भाषा शिकवली आहे. त्यामुळेच आज सर्वच विद्यार्थी मराठी भाषेतून शिक्षण घेत आहे. सध्या ही शाळा जिल्हासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष या शाळेतील विद्यार्थी सोबत संवाद साधला.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून ते सुध्दा आवाक झाले.
यावेळी प्राचार्या सोबत शिक्षण विस्तार अधिकारी तुदाराम राउत,विषय साहाय्यक डाॅ. विजय रामटेके ,शिक्षीका मंखला सुरकर व निलीमा आखाडे तसेच शाळा  व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते..
 
 "दुर्गम भागात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी  शिक्षक करीत असलेले काम फारच कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे. पर्यवेक्षिय यंत्रणेने प्रामुख्याने दुर्गम भागातील शाळा भेटी करुन तेथील शिक्षक करीत असलेल्या कामाची माहिती घेऊन त्याना प्रोत्साहित करावे." 

- शरदचंद्र पाटील 
प्राचार्य डीआयईसीपीडी , गडचिरोली   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos