सट्टा बाजाराने भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिला कौल


वृत्तसंस्था / जोधपूर :  निवडणुकीआधी  कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जातो. त्याचप्रमाणे राजस्थान मधील जोधपूरजवळच्या फालोदी येथील सट्टा बाजाराने भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे. भाजपा प्रणीत एनडीए केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करेल असे सट्टेबाजाराचे म्हणणे आहे.   भाजपाला २५० पेक्षा जास्त जागा मिळतील तसेच एनडीएला ३०० ते ३१० च्या दरम्यान जागा मिळतील असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे. 
  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमुळे मतदारांची भावना बदलली आहे.  एअर स्ट्राइक होण्याआधी फालोदीमधील बुकींनी एनडीएला २८० आणि भाजपाला २०० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण एअर स्ट्राइकनंतर मतदारांची भावना बदलल्यामुळे भाजपा आणि पर्यायाने एनडीएच्या जागा वाढतील असे भाकित बुकिंनी वर्तवले. सट्टा बाजाराने काँग्रेसच्या जागाही कमी केल्या आहेत. आधी काँग्रेस १०० च्या आसपास जागा जिंकेल असे बुकिंनी म्हटले होते पण आता ७२ ते ७४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-18


Related Photos