महत्वाच्या बातम्या

 कृषी दिनानिमित्य महिला शेतकऱ्यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / खांबाडा : शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हटले जाते. त्या अनुशगाने महाराष्ट्र राज्याचे माजी कृषि मंत्री वंसतराव नाईक यांनी प्रथमता कृषी क्षेत्रासंबंधी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणुन या क्षेत्रात खुपमोठि क्रांती घडवून आणली म्हणून त्यांच्या जन्मदिनी कृषीदिन म्हणून संपुर्ण राज्यात साजरा केला जातो. 

याच निमित्याने पंचायत समिती वरोरा येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये मौजा खंबाडा येथील प्रगतशील महिला शेतकरी शोभा पंढरी ताजने यांचा रब्बी पिक स्पर्धा पीक हरभरा मध्ये ३५.७०० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेऊन तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा तालुका कृषी अधिकारी वरोरा व पंचायत समिती विभाग यांनी शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

त्यावेळी त्यांनी त्यांनी मनोगत व्यक्त करताना हरभरा पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी अवलंबलेले तंत्रज्ञान तसेच खांबडा चे कृषी सहाय्यक चौरे यांनी हरभरा पिकाबद्दल वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज आमचा पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने विविध पिकामध्ये खरीप व रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन बाकी शेतकऱ्यांना आदर्श घालून देतो. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos