महत्वाच्या बातम्या

 आ. किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था रत्नापुरचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गट ग्राम पंचायत मध्ये समाविष्ठ असणाऱ्या रत्नापूर (हेटी) येथे चिमुर-नवरगांव रोडच्या बाजुला जनतेच्या आर्थिक देवाण घेवाण साठी व जनतेच्या हितासाठी सुरु झालेल्या राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या रत्नापूर (कार्यक्षेत्र-जिल्हा नों. क्र - सि एच डी / आर एस आर / सि आर/१२७/२०२३-२४) या बँकचे नुकताच ३० जून २०२३ ला उदघाटन (लोकार्पन) संपन्न झाले.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. किर्तीकुमारजी (बंटी) भांगडीया यांच्या हस्ते सदर उद्घाटन संपन्न झाले. समारंभाच्या अध्यक्ष स्थानी चंद्रपूर जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य तेजराम कापगते होते, प्रमुख अतिथी म्हणून नवरगावचे जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच गोपाल चिलबुले, भा.ज.प. सिंदेवाही तालुका अध्यक्ष राजेन्द्र पाटिल बोरकर, चंद्रपूर जिल्हा सहकारी संस्था प्रशिक्षण केंद्राचे विकास अधिकारी भारत भालके, संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी तसेच उपाध्यक्षा अर्चना महेश कामडी आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते.

उपस्थीत मान्यवराच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थीत पाहुण्यांणी सुरु झालेल्या पतसंस्था (बॅक) यात सर्व जनतेनी विश्वासाने व्यवहार करावा व त्यांचे प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य करावे आणी या माध्यमातुन आपलाही आर्थिक स्तर सुधारावा, असे मोलाचे विस्तृत व सविस्तर मार्गदर्शन उपस्थीत जनतेला केले. यावेळी बँक बद्दल माहीती व समोरील ध्येय धोरना बद्दलही माहीती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधा अभिलाष लोधे व प्रास्ताविक संस्थेचे संचालक मोरेश्वर बातुलवार यांनी केले. आभार संचालिका हर्षा चेतन बोरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्यासह उपाध्यक्ष अर्चना कामडी, संचालक प्रणवजी वासुदेवराव गायकवाड, जितेंद्र बोरकर, मनिषजी घुगूसकार, अरुण मुद्रिवार, ओमप्रकाश फडणिस, निता वन्नेवार, राधा लोधे, हर्षा बोरकर व इतर कार्यकर्ते कर्मचारी व अभिकर्ता यांनी परिश्रम घेतले. या वेळी मोठ्या प्रमाणात संस्थेचे महीला, पुरुष सभासद तथा गावातील नागरीक उपस्थीत होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos