मोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात वावरत असलेल्या , फास्ट फूडची क्रेझ असलेल्या नव्या पिढीला गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, असे दिसून येते.  सध्याच्या चिमुकल्यांच्या गळ्यात होळीला गाठी विरळच दिसून येते. शिवाय, आजकाल संदेश पाठवून शुभेच्छा देण्याची प्रथा सुरु झाली  आहे. व्हर्च्युअल जगात समाज माध्यमांचा वापर  करून होळी सणाचे संदेश मोबाइलवर खणखणत आहेत. यामुळे गाठीचा गोडवा मात्र कुठेतरी हरवत आहे, असेच म्हणावे लागेल. 
होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही गाठींच्या माळा देण्याची पद्धत आजही पाळली जाते. पांढऱ्याशुभ्र गाठी घालून मिरवण्याची बच्‍चेमंडळीना खूप हौस असते. होळीला पूरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तोच गाठीचाही मान आहे. त्यामुळे होळीला घरोघरी गाठीची खरेदी होतेच. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात. शिवाय वाग्दत्त वधूला मान म्हणून गाठीचोळी पाठवतात. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठीची खरेदी होतेच. गाठी गुढीपाडव्याला पूजेत वापरतात. त्यासाठी म्हणून गाठी घेतात. यंदा तर गाठीच्या भावात थोडी फार वाढ झाली असल्याने  विक्री मंदावल्याचे चित्र आहे. 
भारतीय सण, उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. गाठी घरोघरी देवून सामाजिक सलोखा कायम राहावा, हा उद्देश असावा. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने गाठीचे महत्त्व आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos