१२ एप्रिलला प्रदर्शित होणार मोदी यांच्यावरील जीवनपट, विवेक ओबेरॉयचे सहा लूक प्रदर्शित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जीवनपट लोकसभा निवडणूक प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत, १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या विवेक ओबेरॉयचे सहा लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांची सर्वत्र चर्चा आहे. 
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले असून पुढच्या महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात मोदींच्या आयुष्यातील वेगवेगळे कालखंड दाखवण्यात आले आहेत. त्यानुसार मोदी हे सहा वेगवेगळ्या रूपांत दिसणार आहेत. हे लूक्स सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. 
या सिनेमात अमित शहाची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. तर, जरीना वहाब यांनी पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. उमंग कुमार याआधी सरबजीत सिंगच्या आयुष्यावरील चित्रपट दिग्दर्शित केला होता.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-18


Related Photos