गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन


वृत्तसंस्था / पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज १७ मार्च रोजी निधन झाले आहे. काल शनिवार पासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. मात्र आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. 
मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली.  

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-03-17






Related Photos