सोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
मागील काही दिवसांपासून शिर्डी शहरात धुम स्टाईलने मोटारसायकलवरुन येऊन भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडुन थैमान घालणाऱ्या टोळीला शिर्डी पोलीसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . 
शिर्डी पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी १) किरण छगन सोनवणे रा. दत्तनगर कोपरगांव २) नवनाथ साहेबराव गौर्डे रा.पोहेगाव ३) मनोज चंद्रकांत बडोदेकर रा.बिरोबा रोड शिर्डी दरोड्याच्या उद्देशाने शिर्डीत येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पोलीसांना सुचना देऊन पथक तयार केले व सापळा लावुन मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली व त्यांचे सहकारी १) शरद गोटीराम फुलारी रा.पोहेगाव कोपरगांव २) विशाल भालेराव रा.पोहेगाव कोपरगांव हे दोघे फरार झाले . 
आरोपी विरोधात ४१८/२०१९ भा. द.वि कलम ३९९.४०२ अन्वये गुन्हा दाखल करुन पोलीस कोठडी घेऊन विचार पुस केली असता सदर आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली.  आरोपीकडुन १० तोळे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल असा ३ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर आरोपी विरोधात गु.र.न १०७/२०१९ .२९५ /२०१९.३३३/२०१९४११/२०१९ भा. द. वि कलम.३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली. 
 सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक ईशु सिंधु , अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी, पोहवा ईरफान शेख, पोना सचिन बैसाणे, पोना किरण कुऱ्हे, पोशि नितीन शेलार, पोशि अजय अंधारे, पोशि नितीन सानप यांनी केली.  पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे हे करत आहेत. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-03-17


Related Photos