'पबजी'च्या नादात दोन युवक रेल्वेखाली चिरडले : हिंगोलीतील दुर्घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / हिंगोली :
येथील खटकाळी बायपास भागात शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे आल्याने पबजी गेममध्ये मग्न असलेले दोन मित्र रेल्वेखाली येऊन चिरडले गेले . नागेश गोरे (२२) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (२४) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
 दोन्ही मित्र रेल्वे रुळावर मोबाईल वर पबजी गेम खेळत मग्न झाले होते. याचवेळी अचानक समोर आलेल्या अजमेर-हैदराबाद रेल्वेच्या धडकेने दोघेजण रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही तरूणांचा मृ्त्यू झाल्याने हिंगोली परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती .   Print


News - Rajy | Posted : 2019-03-17


Related Photos