महत्वाच्या बातम्या

 भद्रावती बसस्थानकावरील शौचालयाची दुरावस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बस स्थानकावरील शौचालयाची दुरावस्था झाली असुन ते शोभेची वस्तु ठरली आहे.

अनेक दिवसापासून भद्रावती येथील नवीन बस स्थानक परिसरातील शौचालय दुरावस्था झाल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. या शौचालयाची पाईपलाईन फुटले आहे. दार खिडक्या बेसिन तुटलेले आहे. काही दारुडे या शौचालयाचा वापर दारु पीण्यासाठी करतात.  त्यामुळे येथे  दारू चा रिकाम्या बाटला येथे आढळून आलेल्या आहे. नगर परिषद भद्रावतीचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीचे फलक सुध्दा लावल्यास आले आहे. तसेच बस स्थानकाचा छता समोर एक भला मोठा लोखंडी राड सीमेंटने बांधलेल्या जिर्नौ अवस्थेतील ओट्यातुन बाहेर निघाला असुन या राड ला अडकून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.  तरी याकडे समस्या संबंधित विभागाने त्वरीत दुर कराव्यात, अशी भद्रावतीकर नागरिकांची मागणी आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos