वाहनात गुप्त कप्पा तयार करून दारू तस्करी : ९ लाखांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक


- मुल पोलिसांची अवैध दारू तस्करावर कारवाई  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुल :
पोलिसांनी ताडाळा -चिचाळा येथे सापळा रचुन एका संशयीत टाटा झेनान एमएच ४० एफ ४६६७  वाहनास थांबवून ताब्यात घेतले. सदर वाहनाची पाहणी केली असता दारू तस्कराने शकल लढवून वाहनाच्या मागच्या बाजुस गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये दारू तस्करी करीत असल्याचे आढळून आले . गुन्ह्यात आरोपी भिमराव देविदास येलनकर (२७)  रा. रातचांदना जि. यवतमाळ यास अटक करून ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . 
जवळच आलेला होळी सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर अवैध दारू तस्करीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधिक्षक चंद्रपूर डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवून दारू तस्करी करणाऱ्यावर वेळोवळी कार्यवाही करण्यात येत आहे.  १६ मार्च रोजी मूल पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम एका टाटा झेनान वाहनाने चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी असुन सुध्दा दारूची तस्करी करणार आहे. अशा माहिती वरून मुल पोलिसांनी मौजा ताडाळा -चिचाळा येथे सापळा रचुन एका संशयीत टाटा झेनान एमएच ४०एफ ४६६७ वाहनास थांबवून ताब्यात घेतले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यातील मागच्या बाजुस गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये दारू असल्याचे दिसुन आल्याने वाहन चालक आरोपी नाम भिमराव देविदास येलनकर यास अटक करण्यात आली आणि वाहनातून ५ लाख रुपये किमतीच्या ५० पेटया देशी दारू आणि एक टाटा झेनान वाहन किंमत. ४ लाख रुपये आणि एक मोबाईल फोन कि.५,००० रू असा एकुण ९ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबतचा गुन्हा पोलीस स्टेशन मुल अप.क्र. २२९/२०१९ कलम 65(ई), 83 मदाका अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपुर महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात, मुल पोलिस स्टेशन प्रभारी पोनी  .कासार यांचे सह पोउपनी सतीश सोनेकर, पोहवा सुरेश पढाल, नापोकाॅ मुकेश गजबे, पोशि संजय जुमनाके यांनी पार पाडली.
   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-17


Related Photos