महत्वाच्या बातम्या

 कुनघाडा (रै.) जि. प. कन्या शाळेत नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै. येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळा प्रारंभ दिनी नरेंद्र म्हस्के गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चामोर्शी आणि गोंगले सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी पंचायत विभाग  जिल्हा परिषद गडचिरोली, वांढरे साधनव्यक्ती  यांनी शाळेला भेट दिली. नवागतांचे स्वागतासाठी शाळा फुले आणि फुगे लावून सजवण्यात आली. मुलींचे पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश दिंडी, पुस्तक वितरण, गणवेश वाटप,

मिठाई वाटप अश्या विविध उपक्रमानी आजचा शाळा प्रवेशोत्सव  साजरा करण्यात आला.

सदर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर गव्हारे, इतर पदाधिकारी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक गोटामी, वर्षा गौरकर विषय शिक्षिका, मंडल, गेडाम, बागडे, प्रीती नवघडे, रेखा हटनागर, आणि पालकवर्ग उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos