पंतप्रधानांसह भाजप नेत्यांनी नावासमोर लावले 'चौकीदार'


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले आहे. 
 'चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला होता. आता मोदी आणि अमित शाह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. 
शनिवारी पंतप्रधान मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगसह एक व्हिडिओ टि्वट करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिम सुरु केली आहे. या व्हिडिओमध्ये  प्रामुख्याने लोक सुद्धा ‘में भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर रिट्विट आणि लाईक्स मिळाले आहेत. पण, त्याला देखील राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ‘मै भी चौकीदार’ म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, नीरव मोदी, विजय माल्ल्याचा फोटो ट्विट केला आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-17


Related Photos