नाकाबंदी करीत असलेल्या पोलिस नायकाला भरधाव कारने उडविले


- आरमोरीजवळील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
नाकाबंदी करीत असलेल्या पोलिस नायकाला भरधाव कारने उडविल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास आरमोरी जवळ घडली आहे. केवळराम हिरामण येल्लोरे (३८) रा. गणेशपूर ता. आरमोरी असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. तर मोरेश्वर वामन हेडाउ रा. गोकुलनगर गडचिरोली असे आरोपी कारचालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरमोरी - गडचिरोली मार्गावरील सोनु धाब्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. या ठिकाणी आरमोरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक येल्लोरे हे कर्तव्यावर होते. रात्री एक वाजताच्या सुमारास येल्लोरे हे ट्रकची तपासणी करीत होते. यावेळी मोरेश्वर हेडाउ याने कार क्रमांक एमएच ३३ - ०८८८ या कारने भरधाव वेगाने येत होता. पोलिसांनी हात दाखवून त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने कोणताही विचार न करता भरधाव वेगाने कार पळविली. यामध्ये पोलिस नाईक येल्लोरे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ही कार अनियंत्रित होवून रस्त्याच्या खाली उतरली. पोलिसांनी कारचालक मोरेश्वर हेडाउ याला ताब्यात घेतले.  
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरमोरी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-17


Related Photos