महत्वाच्या बातम्या

 धान खरेदी करीता ई-पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : धान खरेदी करीता पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमधून करणे आवश्यक आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर नोंदणी करावी, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे  

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई -पीक पाहणीचे २.०.११  हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी  १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

तरी राज्यातील सर्व शेतकऱ्याना आवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगाम  २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार नाही.





  Print






News - Bhandara




Related Photos