मरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार


 - आर्थिक मदतीची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / धानोरा
: बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना काल १५ मार्च रोजी धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील कक्ष क्रमांक ५०६ मध्ये घडली. या घटनेत गाय मालक रैसु बिरजू नैताम यांचे ३५ हजारांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
चरण्यासाठी गेलेली गाय परत न आल्यामुळे शोधाशोध करण्यात आली. शोध घेत असताना आज १६ मार्च रोजी जंगलात गाय मृतावस्थेत आढळून आली. गायीची शिकार बिबट्यानेच केली असल्याचे घटनास्थळावरील ठश्श्यांवरून निदर्शनास आले. घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत गायीच्या मालकास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागारीकांनी केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-16


Related Photos