महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सव संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या २७ शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थांना महानगरपालिकेतर्फे दप्तर, बुट मोजे, टाय, बेल्ट, पुस्तक, गणवेश देऊन विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.

सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा मनपा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मनपा मुख्य शहर अभियंता महेश बारई यांच्या अध्यक्षतेखाली विवेक उध्दरवार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, विवेक तामण, विभागीय अभियंता, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, ज्योती राजपूत, जेष्ठ अधिव्याख्यात्या, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, उपअभियंता विजय बोरीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंदा बावणे, उपाध्यक्ष राधा चिंचोलकर तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी वर्ग १० वी मधील गुणवंत विद्यार्थांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश नीत यांनी केले. संचालन उमा कुकडपवार तर आभार प्रदर्शन भास्कर गेडाम यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos