निवडणुकीच्या तोंडावर ८० लाख रुपयांची रोकड जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील सावनेर परिसरातून ८० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर नेत्रावती एक्स्प्रेसमधून ५३२ दारूच्या बाटल्याही  पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही कारवाया निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने केल्या आहेत . 
 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमलं आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी ३० आणि ५० लाख रूपये अशी एकूण ८० लाख रुपयांची रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे.
   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-16


Related Photos