महत्वाच्या बातम्या

 आमदार देवराव होळी यांच्या कडून अनेकांना दिवाळी अंकांची भेट


- कार्यालयात येणारे कार्यकर्ते विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांना देखील दिले दिवाळी अंक सप्रेम भेट
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावजी होळी यांनी आपल्या कार्यालयात येणारे कार्यकर्ते, विद्यार्थी शासकीय अधिकारी, कर्मचारी  व वाचकांना दिवाळी अंक सप्रेम भेट देऊन वाचनासाठी शुभेच्छा दिले.
विविध वर्तमानपत्र आपापल्या दिवाळी अंकांचे प्रकाशन दिवाळी पर्वामध्ये करीत असतात. दरवर्षी आमदार महोदय अशा अंकांची खरेदी करून आपल्या कार्यकर्त्यांना हे दिवाळी अंक भेट देत असतात. या दिवाळी अंकामधून वाचकांना केवळ मनोरंजनच नाही तर त्यांच्या ज्ञानात भर पडणारी माहिती देखील मिळत असते. यामध्ये विविध मान्यवर लोकांचे प्रभावी लेखन, विविध माहितीचे लेख, विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान, त्यातून मिळण्यास मदत मिळेल. असे लेख या दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना मिळावे तसेच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता आपण हे दिवाळी अंक कार्यकर्त्यांना भेट देत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos