अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा मुरमाडी येथे अंनिस तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा मुरमाडी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती गडचिरोली तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश व कपड्यांचे वितरण अनिस जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, शाखा अध्यक्ष गोविंदराव ब्राह्मणवाडे, सुधाकर दुधबावरे ,कमलाकर वारके यांचे हस्ते करण्यात आले. 
याप्रसंगी दुर्गम भागातील ४०० आदिवासी मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद अनिस साठी आगळावेगळा अनुभव होता. यावेळी विद्यालयाचे अधीक्षक सि. इ कोहपरे व एस . आर . ठाकरे उपस्थित होते .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-16


Related Photos