महत्वाच्या बातम्या

 टायटन सबमरीनच्या ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष : डॉक्टर्स करणार तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क : अटलांटिक महासागरात ऐतिहासिक टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाच अब्जाधीशांचा बुडून मृत्यू झाला आहे. टायटन या पाणबुडीतून गेलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याने सर्व जगात खळबळ उडाली.

दरम्यान, टायटन या पाणबुडीचा जो ढिगारा आढळला आहे, त्यात मानवी अवशेष सापडले असल्याची मोठी आहेत.

टायटन या पाणबुडीचा स्फोट होऊन पाचही प्रवाशांचा त्या घटनेत मृत्यू झाला. समुद्राच्या खोलात उतरून स्फोट झालेल्या पर्यटक पाणबुडी टायटनचे अवशेष किनाऱ्यावर आणणण्यात आले. या पाणबुडीचे अवशेष २८ जून च्या दिवशी कॅनडातील सेंट जॉन्स येथील बंदरात होरायझन आर्टिक या जहाजातून उतरवण्यात आले. त्यात मानवी अवशेष आढळल्याचे कोस्ट गार्डने म्हंटले आहे.

समुद्राच्या तळाशी जाऊन या पाणबुडीच्या तुकडे, ढिगारा असे अवशेष गोळा केले जात आहेत. अमेरिकेच्या कोस्टगार्डने हे म्हंटले आहे की पाणबुडीच्या तुकड्यांमध्ये आणि ढिगाऱ्यात मानवी अवशेष आढळून आले आहेत.

कोस्ट गार्डने दिलेल्या निवेदनानुसार,अमेरिकेतले डॉक्टर्स या मानवी अवशेषांची तपासणी करणार आहेत. एका संकेतस्थळाने या विषयीची माहिती दिली आहे. १८ जून रोजी टायटन या पाणबुडीतल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी टायटॅनिक या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र पाणबुडी निघाल्यापासून पुढच्या ९० मिनिटांतच तिचा संपर्क तुटला होता.

१२ हजार फुटांपेक्षा जास्त खाली असलेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ही पाणबुडी गेली होती. या पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर पुढचे सुमारे तीन दिवस शोध मोहीम सुरु होती. या पाणबुडीमध्ये ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा समावेश होता.





  Print






News - World




Related Photos