शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे 'जागतिक ग्राहक दिन' साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
युनेस्को क्लब अंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त कन्जुमर अवेयरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका डी.एच.जुमनाके होत्या. सदर कार्यक्रमाअंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा १९८६ यावर मार्गदर्शन  करण्यात आले. जागतिक ग्राहक दिन २०१९ थिम Trusted a small Products यावरती चर्चा व मार्गदर्शन  करण्यात आले, त्यानंतर कोणतीही वस्तु खरेदी केल्यानंतर जर ग्राहकाची फरवसणूक झाली असे वाटत असल्यास त्यांनी काय करायला पाहिजे, यासाठी ग्राहक संरक्षणाविषयी चित्रफित दाखविण्यात आल्या. चित्रफित दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्धभवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनेस्को क्लबचे सर्व विद्यार्थी सदस्य, शिक्षक सदस्य साठवने व  पेंदाम तसेच क्लबचे डायरेक्टर जी.टी.डोंगरवार यांनी परिश्रम घेतले .

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-16


Related Photos