वासाळा येथे शॉट सर्किटमुळे झोपडी व तणसाचे ढिग जळून खाक


-  विद्युत विभागाच्या हलगर्जिपणामुळे  घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील वासाळा  येथे  काल १५ मार्च रोजी  दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉट सर्किट झाला . यामध्ये १ झोपडी आणि दोन तणसाचे ढिग जळून खाक झाले आहेत. 
 घटनेमध्ये मनोरसिंग बघेल यांची झोपडी तर रुपचंद मेश्राम व घनश्याम राऊत यांचे तणसाचे ढिग जळून खाक झाले. यावेळी वासाळा येथील नागरिकांनी मोठ्याने गर्दी केली होती. नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगून अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यामध्ये जवळपास अंदाजे २० ते २५ हजार रुपये पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  
   यावेळी महसूल विभाग वैरागड चे मंडळ अधिकारी बी. एम. वानखेडे यांनी पंचनामा केला . विद्युत विभागाच्या हलगर्जिपणामुळे  शॉट सर्किट होउन आग लागल्याचे नागरिकांनी आरोप केला.  यावेळी वासाळा ग्रामपंचायतीच्या तात्काळ मदत म्हणून ७०० रुपये सरपंच ओमप्रकाश जौजाळकार यांनी दिले. यावेळेस विनोद राऊत तलाठी सहायक, अनिल आलबनकर, जि. पी. दुधे ग्रामससेक वासाळा, महेश किरमे,  व नागरीक   उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-16


Related Photos