महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम व इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर: चंद्रपूर जिल्हातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये नर्सरी केजी १ केजी २ इंग्रजी माध्यम वर्ग सुरु करण्यात यावे व जिल्हा परिषद शाळा हायस्कूल मध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस शिवानी वड्डेटीवार यांच्या मार्फत शिक्षणाअधिकारी जिल्हापरिषद कार्यालय चंद्रपूर ला बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस प्रितम पाटणकर यांनी केले.


२८ जून ला विश्राम गृह चंद्रपूर इथे सध्याची वाढत असलेली महागाई परिस्थिती लक्षात घेता  चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात मागे पुढे जाऊन प्रत्येक सामान्य गरीब घरातील मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क आहेत.परंतु ज्या कुटूंबातील आर्थिक परिस्थिती सक्षम आहेत त्याच कुटुंबातील मुलं खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेऊन सीबीएसई व अन्य उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात परंतु ग्रामीण भागामध्ये गरीब सामान्य कुटुंबातील आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्यामुळे त्यांच्या मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षण घेणं अशक्य होते.


खाजगी शाळेत प्रवेश न घेता जिल्हा परिषद स्कूल हायस्कूल मध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात व सेमी इंग्लिश किंवा मराठी माध्यमिक शिक्षण प्राप्त करत असतात. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण त्यांना मिळत नाही म्हणून ही परिस्थिती लक्षात घेता  शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे  शिवाणी वड्डेटीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या मार्फत प्रदेश महासचिव युवक काँग्रेस रमीज शेख यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर  मधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आले कि चंद्रपूर जिल्हामधील सर्व जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल मध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे तसेच प्राथमिक स्कूल मध्ये नर्सरी केजी १ केजी २ इंग्रजी माध्यम वर्ग सुरु करून गरीब सामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळेल त्यामुळे ग्रामीण भागातील सुद्धा शिक्षणास प्रगती वाटचाल प्राप्त होणार. यावेळी  उमंग जुनघरे गोवील खुणे होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos