चिकन बिर्याणी विक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपींना ३ वर्षाचा सश्रम कारावास


- प्रत्येकी ६ हजार ५०० रूपयांचा दंड 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
हफ्ता न देता टपरी कशी सुरु केली  अशी विचारणा करून   खंडणी वसुल करणाऱ्या २ आरोपीस प्रत्येकी ३ वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी  ६ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा स्थानीक न्यायालयाने ठोठावली आहे.
 सुब्रत सनातन गाईन,(३६), छोटु उर्फ सुशांत सनातन गाईन,(२९), दोन्ही रा. नवेगाव, ता. जि. गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार   या दोघांनी फिर्यादी सुधीर हिरालाल बघेल हा चिकन बिर्याणी टपरी सुरु करुन साफ सफाई करीत असतांना हफ्ता न देता टपरी कशी सुरु केली अशी धमकी देवुन मारहाण करुन  १ हजार रूपयांची खंडणी वसुल केली.  याबाबत सुधीर बघेल याने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी विरुध्द  गडचिरोली पोलिस ठाण्यात १८ मे २०१८ रोजी कलम ३८४, ३४१, ३२३, ५०६, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
आज १५ मार्च रोजी  मुख्यन्यायदंडाधिकारी  बी.एम. पाटील यांनी  दोन्ही आरोपीस कलम ३८४, ३४ भादवि अन्वये प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १ महिण्याची साध्या कारावासाची शिक्षा कलम ३४१, ३४  अन्वये प्रत्येकी १ महिला साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५०० रु. दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास प्रत्येकी १० दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा, तसेच कलम ३२३, ३४ भादवि अन्वये प्रत्येकी १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक  सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos