महत्वाच्या बातम्या

 येरवडा कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर : ४ मोबाईल तर ३ सीम जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहात चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड आढळून आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये हे मोबाईल आढळून आले आहेत.

या प्रकाराने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर मोबाईल आढळून आल्याने कारागृहातील अधिकाऱ्यांकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलच्या साह्याने मोबाईल कारागृहात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कारागृहाचे रक्षक गस्त घालत असताना मुद्रा न्यायालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंती लगत एका कप्प्यामध्ये चार मोबाईलसह तीन सिम कार्ड आढळून आले आहेत. मोबाईल बॉलच्या साह्याने भिंतीच्या पलीकडून कारागृहात मोबाईल येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

कारागृहात सध्या अनेक कुख्यात गुन्हेगार असून या गुन्हेगारांना बोलण्यासाठी बाहेरच्या मार्गाने थेट मोबाईल फोन बॉलच्या साह्याने कारागृहात फेकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच याच कारगृहात दोन गटामध्ये मोठा राडा झाला होता. यामध्ये काही जण जखमी झाले होते. या राड्यानंतर आता पुन्हा एकदा कारागृहात मोबाईल फोन आणि सीम कार्ड आढळून आले आहेत, या प्रकाराने खळबळ उडाली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos