हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी चोघांवर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेकडून चोघांवर कारवाई करण्यात आली आहे. 
पूल दुर्घटनाप्रकरणी संबधित अभियंत्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहेत तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी होणार आहे. तर मुंबईतील २९६ पुलांचं पुन्हा ऑडीट करण्यात येणार आहे. तसेच, स्ट्रक्चर ऑडिटचा चुकीचा अहवाल देणारी देसाई कन्सल्टनला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी , ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचं निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-15


Related Photos