महत्वाच्या बातम्या

 भाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर-कॉम्प्लेक्स वार्डात घर-घर चलो महा जनसंपर्क अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली शहरातील सोनापूर-कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी नगर मधील बुथ क्र. ११७, ११८ व ११९ येथील प्रत्येक घरामध्ये भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात घर-घर चलो महा जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.

यावेळी सोनापूर-कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी नगरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना केंद्रातील मोदी सरकारने ९ वर्षाच्या कालावधीत केलेली चांगली लोकोपयोगी कामे, शासनाचे चांगले निर्णय व विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच शासनाच्या घरकुल, शौचालय, गरीब कल्याण तसेच किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान मोदी सरकारच्या चांगल्या कार्याची व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी लाभार्थी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री तथा शक्ती केंद्र प्रमुख वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा सोनापूर कॉम्प्लेक्स वार्डाचे बुथ प्रमुख विवेक बैस, महिला आघाडी च्या शहर उपाध्यक्ष ज्योती बागडे, शहर सचिव नीता बैस उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos