लाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले ला उद्यापर्यंत पोलिस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
धडक सिंचन विहिर योजनेचे अंतिम देयक काढून देण्यासाठी ४  हजारांची लाच घेणारा जिल्हा परिषद सिंचाई विभागाचा लाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले याला उद्या १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
काल १४ मार्च रोजी शाखा अभियंता बोदेले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात अटक केली होती. बोदेले याने महिला लाभार्थ्यांकडून  ११ हजार धडक सिंचन विहिर योजनेचे अंतिम देयक काढून देण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ४ हजारांची लाच स्वीकारतांना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज १५ मार्च रोजी जिल्हा न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश संजय मेहरे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने उद्या १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos