अहेरी येथील एस. बि.महाविदयालयात वकृत्व स्पर्धेतून मतदान जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /अहेरी :
स्थानिक श्री.शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविदयालयात मतदान जन-जागृति करीता वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली .या स्पर्धेत दहा विद्यार्थी  सहभागी झाले होते.येणाऱ्या लोकसभेचा विचार करता या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मत नोंदविले. मतदार हा जागरूक असला पाहिजे,उमेदवार योग्य की अयोग्य हे मतदात्याना ओळखता आले पाहिजे,बरेच दा मतदाते हे प्रलोभनाला बळी पडतात व आपले मत विकतात ही बाब भारतीय लोकशाही ला घातक आहे तर उमेदवार निवडत असता ना पायाभुत सुविधाचा विचार करणारा असावा,संसदेत जन सामान्या चे प्रश्न मांडणारा असावा ,त्यामुळे योग्य तोच उमेदवार निवडुन द्यायला पाहिजे,आणि मतदाना चा अधिकार बजावलाच पाहिजे,विद्यार्थ्यांचे असे विचार या वकृत्व स्पर्धेतुन पुढे आलेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागा च्या वतिने या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. नागसेन मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक  प्रक्रिया व मतदानातिल मतदात्या ची भूमिका समजावून सांगितली या प्रसंगी कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य मोरेश्वर बोरकर होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासोयो अधिकारी प्रा.मंगला बनसोड यांनी केले, संचालन कोण्डया दहागावकर यांनी तर आभार अंकुश गुप्ता यांनी मानले.कार्यक्रमा च्या यशस्वी ते करीता प्रा.गौरकार व प्रा.कोरेत यांनी प्रयत्न केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos