कुमटपार गावानजीक नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षल कारवाया सुरुच असून, आज १५ मार्च रोजी  भर दुपारी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत कुमटपार गावानजीक चार वाहने जाळली. जळालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रॅक्टर्स, एक जेसीबी व दोन मिक्सर मशिनचा समावेश आहे.
कुमटपार येथे रस्त्याचे काम सुरु असताना आज दुपारी सशस्त्र नक्षलवादी तेथे गेले. त्यांनी कामावरील मजुरांना धमकावून वाहने पेटविली. मालेवाडा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. वाहने पेटविण्याची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. १२ मार्चच्या रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत पुस्के गावानजीक रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्सना आग लावली होती, तर त्यापूर्वी १० मार्चला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos