भामरागड तालुक्यातील आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांची दृष्टीदोष तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांची दृष्टीदोष तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या विद्यार्थ्यांना लवकरच चष्म्यांचे सुध्दा वितरण केल्या जाणार आहे. ११ ते १४ मार्चदरम्यान तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये तपासणी करण्यात आली.
भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात मागील दहा वर्षांपासून नेत्र चिकीत्सा अधिकारी हे पद रिक्त आहे. यामुळे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. या बाबीचा विचार करून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाक डाॅ. किरण मडावी यांनी आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीदोष तपासणीसाठी विशेष पथक पाठविले. जिल्हा सामान्य रूग्णालयातील नेत्र चिकीत्सा अधिकारी राकेश चांदेकर यांच्या नियंत्रणात ए.एस. तागवान, परीख ढोमणे यांनी मन्नेराजाराम, चिचोडा, ताडगाव, हेमलकसा, लाहेरी, कोठी, भामरागड व पेरमिली येथील आश्रमशाळांना भेटी देवून उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी केली. दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच चष्म्यांचे वितरण केले जाणार आहे.  राकेश चांदेकर हे मागील २० वर्षांआधी भामरागड ग्रामीण रूग्णालयात कार्यरत होते. त्यांच्या उत्कृष्ट कामाची भामरागड तालुक्यातील जनता आजही प्रशंसा करते, हे विशेष.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos