कोरची येथे शाळा समितीच्या सदस्यांची कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोरची :
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व  कोरची पंचायत समिती अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची, बेडगाव, बेतकाठी, बोटेकसा, देऊभट्टी केंद्रात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक आकांक्षित जिल्हा तालुका संघटक दीपक सिंग हे होते . 
या प्रशिक्षणात शाळा समितीच्या सदस्यांचे कर्तव्य, अधिकार, विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविणे,बाल रक्षक कायदा, शिक्षणाचा हक्क, शाळा विकास करण्यासाठी हातभार लावणे, विद्यार्थ्याचे शंभर टक्के उपस्थिती,भरती पात्र विद्यार्थ्याना शाळेत दाखल करणे, डिजिटल शाळा करण्यासाठी सहकार्य करणे, लोकसहभागातून शाळा रंगरंगोटी करणे आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.  
यावेळी केंद्रप्रमुख येलेश्वर कोमरेवार,पुरुषोत्तम चापले, कृष्णा नारदेलवार, प्रभाकर बारसिंगे,मींनात नखाते यांनी सहकार्य केले या प्रशिक्षणात पाचही केंद्रातील शाळा समिती सदस्य व  मुख्याध्यापक प्रशिक्षणात हजर होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos