गडअहेरी शाळेत जिल्ह्यातील पहिला युनेस्को क्लब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील गडअहेरी येथील जि.प.शाळेत युनेस्को क्लब स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ शाळांनी नोंदणी केली असून गडअहेरी शाळा ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून शिक्षकांनाही आशियाई देशात तसेच ईशान्य व उत्तर भारतातील शैक्षणिक अभ्यासाची संधी मिळणार आहे.
डॉ. धीरेंद्र भटनागर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष-वर्ल्ड फेडरेशन आँफ युनेस्को क्लब व जनरल सेक्रेटरी-CUCAI- कॉन्फेडरेशन ऑफ यूनेस्को क्लब आॅफ इंडिया आणि विजय पावबाके युनेस्को क्लब चे राज्य समन्वयक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
 या युनेस्को क्लबच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जाऊन आपली संस्कृती व कला सादर करण्याची व इतर देशातील संस्कृती  अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय कान्फरन्स व स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण पुरक उपक्रम राबविणे हे युनेस्को क्लब चे मुख्य उद्दिष्ट आहे.
 यात शाळेतील १५ कृतिशील विद्यार्थ्यांचा क्लब स्थापन करण्यात आला आहे. शाळेचे उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टीवार  हे क्लब डॉयरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत. पहिली मोबाईल डिजिटल शाळा, प्रगत शाळा, विविध नवोपक्रम या शाळेने राबविलेले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबतीत ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असून युनेस्कोचे प्रमुख डॉ धीरेंद्र भटनागर यांचेकडून नुकतेच या शाळेला युनेस्को क्लब सलग्नता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. शाळेच्या या उपलब्धेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos