महाराष्ट्र अंनिस ने घेतली कैद्यांची शाळा


- अंनिस रोखनार सर्पदंशामुळे होणाऱ्या  मृत्युचे प्रमाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात विषारी सर्पदंश  झाल्यास स्वतःचा जीव कसा वाचवावा या विषयावर ५६ कैद्यांना प्रशिक्षित केले. आज १५ मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 
अंनिस ने जिल्ह्यातील सर्पदंशाने मृत्युचे  प्रमाण लक्षात घेता २८ फेब्रुवारी पासून 'आता धरू एकच ध्यास,  ना मरेल माणुस ना मरेल साप' या नावाखाली जिल्हयात अभियानाची सुरूवात केली असुन जिल्ह्यातील आश्रमशाळा व दुर्गम भागात अभियान राबविले जात आहे. त्यासाठी अंनिसने अभ्यासपुर्वक शास्त्रीय आराखडा तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारागृहातील कैद्यांसाठी  प्रशिक्षणात्मक उद्बोधनाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमाला कारागृह अधिक्षक बी.सी.निमगडे , हवालदार नेमाडे,आंबोरकर, जाधव पुर्ण वेळ उपस्थित होते.  प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक  म्हणून अंनिस चे  जिल्हाध्यक्ष उध्द्व डांगे, सर्पमित्र विलास पारधी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिस कार्यकर्ते संजय कुरसंगे, अतुल गंडाटे, विवके मुन, प्रफुल गंडाटे, सुरज ठाकरे, विपूल गंडाटे, ज्ञानेश्वर गंडाटे, चंदुलाल गेडाम यांनी  सहकार्य केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos