महत्वाच्या बातम्या

 डॉ. प्रेमानंद खंडाळे सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित


- सावित्रीबाई फुले संस्थेच्यावर्धापनदिन निमित्त विद्यार्थ्यांनीचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : दृष्टीहीन जनकल्याण बहुद्दीशिया संस्था बल्लारपूर यांच्या वतीने सातव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मातोश्री वृद्धश्रम भिवकुंड, विसापूर येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग पिसे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अरुण लाडे, लाडे, बल्लारपूर येथील समाजसेवक प्रकाश तोहोगावकर, सौ. तोहोगावकर, डॉ. रवी मुरमाडे तसेच मातोश्री वृद्धाश्रम व्यवस्थापक प्रशांत घोटेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अंधांचे प्रेरणा स्थान लुई ब्रेल व हेलन केलर यांच्या फोटोला माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. प्रेमानंद खंडाळे व लता खंडाळे शाल श्रीफळ प्रदान करण्यात आले. तिथे उपस्थिती मान्यवरांनी वृद्धाश्रमातील नागरिकांना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेच्या नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात त्या बद्दल कौतुक करावे तितके कमी आहे, असे म्हटले. दहावी उत्तीर्ण झालेली रंजना कुर्जेकर या अंध विद्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यात आला. तसेच पाच अंध जोडप्यांना घरी येणारी उपयोगी वस्तू प्रधान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश शेंडे तर प्रास्ताविक मारोती भालशंकर यांनी केले तर आभार दिलीप गेडाम यांनी केले. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश बावणे, अविनाश उपाध्याय, श्रद्धा शेंडे, गौरव चनेकर, सिया उराडे यांनी केले. याप्रसंगी मोठया प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos