टप्पा दोन मधील पाणी पुरवठयाची कामे ३० मार्च पर्यंत पूर्ण करावी : विवेक भिमनवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
या वर्षी जिल्हयात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्हयात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य दयावे तसेच पाणी टंचाई आराखडयाच्या टप्पा दोन मधील उपाययोजनाची कामे ३० मार्च पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांचे अध्यतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता,
तसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्त साठा ६८. ४२० द.ल.घ.मी. असून एकुण साठवण क्षमतेच्या १३ टक्के आहे. तसेच धाम प्रकल्पामध्ये ११. ०२ द.ल.घ.मी. एवढा पाणी साठा शिल्लक असून यामधून वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुन पर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो . ज्या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडिने तपासणी करुन योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे अशाच ठिकाणी विंधन विहीरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करु नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी भूजल संर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिका-यांना दिले.
जिल्हयात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये ६०२ गावामध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आलेल्या आहे. यात जानेवारी मार्च या दुस-या टप्प्यात १९९ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली तर एप्रिल ते
जुन या तीस-या टप्प्यात १३७ नळ पाणी पुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकिय मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्च पर्यंत सादर करावे या कामासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाई सदृष्य गावे घेण्यात यावी.



  Print






News - Wardha | Posted : 2019-03-15






Related Photos