मोफेड वाहनातून दारूची तस्करी : देसाईगंज पोलिसांनी ४९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
देसाईगंज पोलिसांनी देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ १४ मार्च रोजी नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली असता अर्जुनी मोरगाव कडून येणाऱ्या मोफेड वाहनात १४ हजार ४०० रुपयांचा अवैद्य दारूसाठा आढळून आला . पोलिसांनी वाहनासह ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल केला . विजय धनलाल गायधने (४७) रा . दत्तोरा, जि गोंदिया असे आरोपीचे नाव आहे . 
गुन्ह्यातील आरोपीने अर्जुनी मोरगाव वरून वरून पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची ऍक्टिव्हा स्कुटी क्रमांक एमएच ३५ एक्स ०६८५ यावर बॅगमध्ये विदेशी कंपनीची दारू भरून अवैद्यरित्या विनापरवाना वाहतूक करीत असताना देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ मिळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोहवा श्रीराम करकाडे करीत आहेत .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos