काळिमा फासणारी घटना : कामगाराला खायला लावली विष्ठा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पिंपरी (पुणे )
: मालकाला राग अनावर झाल्याने त्याने कामगाराला चक्क विष्ठा खाण्यास भाग पाडले. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. याप्रकरणी संदीप पवार नामक व्यक्तीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 मिळालेली माहितीनुसार ,फिर्यादी कामगार व त्याचे कुटुंबीय पवार याच्या वीटभाट्टीवर कामाला असून तेथेच रहायला आहे.  बुधवारी दुपारी फिर्यादीचे कुटुंबीय वीटभट्टीजवळ असताना 'कामाला सुरुवात कर', असे पवार कामगाराला म्हणाला, त्यावेळी कामगार म्हणाला  'आताच जेवण केलंय थोडा वेळातच कामाला सुरुवात करतो'. दरम्यान कामगार असे म्हटल्याने मालकाला राग अनावर झाला. यावरून मालकाने त्याला शिव्या दिल्या. त्यानंतर कामगारनेही मालकाला शिव्या दिल्या. यामुळे संतापलेल्या पवार याने कामगाराला विष्ठा खा असे सांगत त्याच्या आई बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. मात्र, यावर कामगाराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मालकाने त्याला मारहाण केली.  यामुळे घाबरलेल्या कामगाराने विष्ठा खाल्ली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-15


Related Photos