अवैद्य दारू तस्कराकडून ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त : देसाईगंज पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
देसाईगंज पोलिसांनी देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ १४ मार्च रोजी नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली असता अर्जुनीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात अवैद्य दारूसाठा आढळून आला . याप्रकरणी पोलिसांनी  ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे . शैलेश हरिशंकर गर्ग (४२) रा . सेट प्रतापवार्ड मेन रोड गोंदिया असे आरोपीचे नाव आहे . 
गुन्ह्यातील आरोपीने अर्जुनी वरून पांढऱ्या रंगाची मारुती सुजूकी कंपनीची अल्टो कार क्रमांक एमएच ३१ डीसी ८६६०  यामध्ये विदेशी कंपनीची दारू भरून अवैद्यरित्या विनापरवाना वाहतूक करीत असताना देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ मिळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos