फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात आयोजित 'स्त्रिया संबंधीत सुरक्षा' परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
फुले आंबेडकर काॅलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे सांस्कृतीक विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त समाजात वावरणाऱ्या स्त्रिया संबंधीत सुरक्षा या विषयावार आयोजित परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.के.खंगार होते . प्रमुख अतिथी म्हणून सिंधुताई पोरेडडीवार कनिष्ठ महाविद्यालय, गोगाव प्राचार्य कविताताई पोरेडडीवार, अरूंधती नाथानी होत्या.
जागतिक महिला दिन सप्ताहामध्ये महिलांचा सत्काराचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. महिला म्हटले तर मानाचे, आदराचे स्थान असलेले मायेचे प्रतिक म्हणून आईकडे बघितले जाते.  परंतु जगातील स्त्रियांची स्थिती अजूनही दुय्यम दिसुन येत आहे. त्याच अनुषंगाने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती कविताताई पोरेडडीवार यांनी हजारो वर्ष स्त्री पुरूष संदर्भाचा तोल एकाच बाजूने झुकलेला आहे.  आता तो सावरायची वेळ आली आहे. महिलांना स्वत :वरचा आत्मविश्वास , जिद्द ,दृढ  निश्चय , प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर यश हे खेचुन आणता येते, असे मत उदाहरणसह त्यांनी व्यक्त केले .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.एस.के.खंगार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी आपल वेगळ अस्तीत्व निर्माण करून शिक्षण प्राप्त केलं पाहिजे, असे मत व्यक्त केल.
याप्रसंगी महाविद्यालयात कार्यरत सर्व महिला कर्मचारी वर्गाचा येथे सत्कार करण्यात आला. त्यात प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा.कु.वर्षा तिडके, प्रा.सरीता बुटले, प्रा.कविता उईके, श्रीमती अनिता ठाकुर, कु.कादंबरी केदार यांचा समावेष होता. कर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.तिडके यांनी केले तर संचालन सपना मानपल्लीवार यांनी केले आणि उपस्थितांचे आभार सहायता मेश्राम यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या सर्व सहायकांनी व विदयार्थ्यांनी सहाकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos