भिमपुर जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
जि. प. उ. प्राथ. शाळा, भिमपुर येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्प, सिंदपुरी, पर्वतकिनार पवनी, चप्राड येथे गेली. विद्यार्थ्यांनी विविध स्थळावरून नवीन माहिती जाणून घेत या सहलीचा आनंद लुटला . 
सर्वप्रथम सिंदपुरी येथील विहार, गौतम बुध्दाच्या विविध मुर्तीचा अभ्यास करून सर्वानी जेवन केले. त्यानंतर पवनी येथील जुन्या काळातील पवन राजाच्या किल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणुन घेतली. प्रत्यक्ष किल्ला मुलांना पाहायला मिळाला तयानंतर इंदिरानगर गोसेखुर्द प्रकल्पाचा जवळपास १ तास अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. याच प्रकल्पावर सुरू असलेले विजनिर्मीती केंद्राची माहिती सुध्दा विद्यार्थ्यांनी जाणुन घेतली. 
त्यानंतर चप्राड येथील टेकडीवर असलेले दुर्गा माता मंदिरात विद्यार्थी पोहचले. टेकडी चढताना टकिगंचा अनुभव सुध्दा विद्यार्थ्यांना घेेता आला. मंदिरातील देवीचे दर्शन होऊन परिसराचे निरीक्षण केले व शाळेचे सर्वजन सहलीच्या परतीच्या प्रवासाला निघाले. परत येतांना वडसा येथे धावती आगगाडी सुध्दा मुलांना बघायला मिळाली. 
सहलीकरीता शिक्षक  दुधबावरे , अंबादे , बोरकर मॅडम, चिमणकर , दाते मॅडम, शाळा व्यवस्थ्या समिती सदस्य सुरतीया मडावी, शोभा दरवडे आणि इयात्ता २  ते ७  मधील ३१ विद्यार्थी सहभागी होते. सर्व विद्यार्थ्यांनी सहलीचा मनसोक्त आनंद लुटला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सहलीमधुन ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास केला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos