फुले आंबेडकर काॅलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली तर्फे रांगोळी स्पर्धेतुन मतदान जागृती


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
फुले आंबेडकर काॅलेज ऑफ  सोशल वर्क, गडचिरोली येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने मतदार जनजागृती सप्ताहानिमीत्य ‘मतदान जनजागृती हक्क’ या विषयावर आयोजित रांगोळी स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.  
भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिलेला असुन लोकशाही बळकट करण्यासाठी भावी पिठीने, नविन मतदाराने त्यात जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचे प्रमाण वाढविण्याचे रांगोळी स्पर्धेच्या निमित्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला. यात प्रथम क्रमांक दिशा नैताम, व्दितीय क्रंमाक स्वाती आभारे व तृतीय क्रंमाक मोहिनी कुंभरे यांनी पटकविला. स्पर्धेच्या  परिक्षणाचे कार्य प्रा. सुनिता साळवे यांनी पार पाडले. 
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डाॅ. एक.के. खंगार यांनी सर्व युवक-यंवतीनी मतदान करून इतर मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे असे आवाहन केले. 
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.  वर्षा तिडके, कु कादंबरी केदार व सांस्कृतिक विभागाच्या सर्व सहाय्यकांनी, विद्यार्थाने सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्रध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos