राष्ट्रीय मतदार जागृती करीता प्रा. गिरीश काळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाची वर्धा तालुका स्तरावर सुव्यवस्थीत नियोजन करुन जिल्हयातुन सर्वाधिक नविन मतदारांची नोंदणी केल्या बद्दल प्रा. गिरीश काळे यांना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
न्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. गिरीश काळे यांनी राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाची वर्धा तालुका स्तरावर योग्य आखणी व सुव्यवस्थीत करुन जिल्ह्यातुन सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी केली. तसेच शाळा व महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी श्री. भिमनवार यांनी त्यांच्या कार्यालयात. प्रशस्ती पत्र व 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केले. यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारी श्री. प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. गिरीश काळे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी मागिल एक वर्षापासुन नोडल अधिकारी म्हणून मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातुन शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम व स्पर्धा यशस्वीपणे राबविल्या मतदारांशी संवाद साधुन कुणीही मतदार मतदानाच्या हक्कापासुन वंचित राहणार नाही याकरीता ते सक्रीय सहभागी राहीले. तसेच वृत्तपत्रातून मतदार जनजागृतीकरीता त्यांनी विविध लेख लिहून मतदार जनजागृतीचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच दिनांक २५ जानेवारी २०१९ राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त्याने आयोजित जनजागृती मोहिममध्ये साकारलेल्या विविध कलाकृतीमध्ये विशेष सहभाग नोंदविला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार “लोकशाही पंधरवाडा’ २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान विविध उपक्रम व स्पर्धा, पंचायत समिती, वर्धा तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातुन ग्राम पातळीवर राबवून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.  Print


News - Wardha | Posted : 2019-03-15


Related Photos