महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा रद्द : वादाची बाब कुलगुरूंनी फेटाळली 


- ६ जुलै ला वर्धा जिल्ह्याच्‍या दौर्‍यावर येनार होते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारताच्या राष्टपती द्रौपदी मुर्मू यांचा ६ जुलै चा नियोजित दौरा रद्द झाला. वर्धा  येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होत्या. तसेच सेवाग्राम आश्रमाला भेट देणार होत्या. हा दौरा वेळेवर रद्द झाल्याने तर्क वितर्क व्यक्त होत आहे. 

विद्यापीठातील वादाने हा दौरा रद्द झाल्याचे चर्चा होत आहे. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार यांनी म्हंटले कि काल सायंकाळी राष्ट्रपतींच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने दौरा रद्द झाल्याचे अवगत केले. 

येणे सोयिस्कर ठरत नसल्याचे मत ठरविण्यात आले. कोणताही वाद आमच्या पातळीवर नाही, तसेही काही बाबतीत घोळ होताच सेवाग्राम दौरा ठरला. मग रद्द झाला व परत ठरला. तसेच राष्ट्रपतींच्या भोजन स्थळाचेही झाले. नागपूर विमानतळावर त्या भोजन घेणार असल्याचे कळले. अन्य काही बाबी असतील तर त्याबाबत सांगता येणार नसल्याचे कुलगुरू म्हणाले.

अन्य एका विद्यापीठ अधिकाऱ्याने वेळेवरच्या तक्रारीवर मान्यवरांचे दौरे रद्द होत नसल्याचे स्पष्ट केले. निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या की, दौरा रद्द झाल्याची बाब विद्यापीठाकडूनच कळली. सर्वच कार्यक्रम रद्द झाले अथवा नाही, हे आता सांगू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले.





  Print






News - Wardha




Related Photos